पुणे दिनांक १३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती एक खळबळजनक अपडेट बीड जिल्ह्यातून आली असून.बीड जिल्ह्या मधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मीक कराड याचे नाव ३०२ गुन्ह्यात सामाविष्ट करावे.व तसेच त्याच्यावर मकोका कायदा लावावा.या मागणीसाठी आज सोमवारी सकाळी १० वाजता देशमुख कुटुंबीय व मस्साजोग गावातील नागरिक आज आंदोलन करणार आहेत. जर वाल्मीकला कराडला सरपंच यांच्या खुनाच्या गुन्ह्यात घेतले नाही तर आज सकाळी १० वाजता मोबाईल टॉवरवर मी स्वतःला संपवून घेईल.असा इशारा मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिला आहे.
दरम्यान मराठा समाजांचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आज बीड येथील मस्साजोग गावात जाण्यासाठी निघाले आहेत.ते सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.११ वाजण्याच्या सुमारास ते पोहोचतील दरम्यान राज्यभर विविध ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या न्याया साठी मोर्चा काढल्यानंतर आज मस्साजोग गावाचे नागरिक मोठ्या संख्येने आंदोलन करणार आहेत. दरम्यान महायुतीच्या सरकारने या गुन्ह्यात एकूण आठ जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन मकोका कायदा लावण्यात आला आहे.तसेच यातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच्यावर खुनाचा आणि मकोका कायदा अंतर्गत गुन्हा दाखल न करता त्याला महायुतीचे सरकार हे एक प्रकारे वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.असा आरोप देशमुख कुटुंबीय व गावातील नागरिक करत आहेत.दरम्यान कोणत्याही परिस्थितीत वाल्मीक कराड यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा व मकोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी आज मोठे आंदोलन उभारण्यात आले आहे.