पुणे दिनांक १३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक बीड जिल्ह्यातून मस्साजोग गावातून खळबळजनक अपडेट आली असून.सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख व गावकरी पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. तर पोलिसांचा बंदोबस्त मोबाईल टॉवरपशी आहे.हे आता पोलिसांना याची माहितीच नाही.आता सर्व गावकरी हे पाण्याच्या टाकीवर चढले आहेत.तर काही गावकरी हे मोबाईल टॉवर पशी आहेत.तर मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील हे घटनास्थळी पोहोचले आहेत.व त्यांनी धनंजय देशमुख व गावकरी यांना खाली येण्यास विनंती केली आहे. दरम्यान पोलिसांनी मोबाईल टॉवरपशी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.पण त्यांनी पाण्याच्या टाकीवर पोलिस बंदोबस्त तैनात केला नाही.पोलिस .एसआयटी.सिबीआय.हे देशमुख यांना तपासाबाबत माहिती देत नाहीत.व मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच मोकोका कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी आज मस्साजोग गावात आंदोलनचा इशारा दिला होता.