पुणे दिनांक १७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबईतून खळबळजनक अपडेट आली असून.शिवसेना शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुक्तागिरी बंगालच्या समोरच त्यांचा बाॅडीगार्ड व तिथे बंदोबस्तावर असले ल्या ड्युटीवरील पोलिस कर्मचारी यांच्यात राडा झाला आहे.दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बाॅडीगार्डचा हात हा तिथे ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचारी यांना लागल्यावरुन हा या दोघांमध्ये वाद झाला असल्याचे समोर आले आहे.दरम्यान यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने दोघांची समजूत काढत त्यांच्या मधील वाद मिटवला आहे.दरम्यान गुरुवारी मुक्तागिरी बंगालवर एक मिटींग आयोजित करण्यात आली होती. सदरची मिटींग संपल्यानंतर हा प्रकार घडला आहे. अशी माहिती मिळत आहे.