पुणे दिनांक १७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक अपडेट ही उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यातून आली आहे.उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यात देशभरातून कोट्यवधी भाविक दाखल झाले आहेत.दरम्यान येथे काही युवकांनी या मेळाव्यात स्टाॅल लावले होते.व यात महाकुंभाला अंधश्रद्धा म्हणू लागले.व तसेच बॅनर व पोस्टर्स लावून निषेध करु लागले.दरम्यान या बाबतची माहिती साधू यांना मिळाल्यानंतर ते सर्व आक्रमक झाले व नागा साधू.तसेच असंख्य भाविक हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या स्टाॅलची तोडफोड केली आहे.तसेच येथील बॅनर व पोस्टर्स जाळून टाकले आहे.दरम्यान यावेळी काहीकाळ येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.