पुणे दिनांक १८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक सकाळी बीड जिल्ह्यातून अपडेट आली असून.बीड जिल्ह्यातील केज तालुक्या मधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले.सुधीर सांगळे.महेश केदार.प्रतिक घुले.जयराम चाटे.सिध्दार्थ सोनवणे.यांची आज कस्टडी संपणार आहे.त्यामुळे त्यांना आज शनिवारी बीड जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.पंरतू न्यायालयात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून या सर्व आरोपींना न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजार करण्यात येण्याची शक्यता आहे.दरम्यान आजच्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.या सर्व आरोपींच्या विरोधात मकोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.तसेच यातील एक आरोपी अद्याप फरार आहे.