Home Breaking News रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना न मिळाल्याने शिवसैनिक आक्रमक

रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना न मिळाल्याने शिवसैनिक आक्रमक

48
0

पुणे दिनांक १९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती एक खळबळजनक अपडेट रायगड येथून आली आहे.रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले यांना न मिळाल्याने महाड मध्ये गोगावले यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत शिवसैनिक यांनी शनिवारी रात्री उशिरा मुंबई ते गोवा महामार्गावर टायर जाळून निदर्शन केले आहे.शिवसैनिकांनी जवळपास दोन तास हा महामार्ग रोखून धरला होता. दरम्यान महाड औद्योगिक वसाहत व महाड शहर पोलिसांनी 👮 या मध्ये हस्तक्षेप करून शिवसैनिकाना बाजूला करून या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली आहे.दरम्यान काल संध्याकाळी राज्यातील पालकमंत्री यांच्या पदाची घोषणा करण्यात आली आहे.दरम्यान रायगड येथून भरत गोगावले हे इच्छुक होते.पण त्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिल्याने शिवसैनिक हे आक्रमक होत  मुंबई ते गोवा महामार्गावर टायर जाळून रस्त्यावर उतरले होते.

Previous articleसैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा आरोपी ठाण्यात सापडला, ‘ आरोपी ठाण्यातच पण मुंबई पोलिसांचा संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर वळसा न‌ऊ वाजता मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद
Next articleवाल्मिक कराडची ईडीच्या मार्फत चौकशी व्हावी – राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी आता ईडी यात उडी मारणारा का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here