पुणे दिनांक १९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मलाच टार्गेट करण्याचा काही लोक जाणिव पूर्वक प्रयत्न करत आहेत.फक्त बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात सामाजिक सलोखा मोठ्या प्रमाणावर बिघडला आहे.असे म्हत्वाचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.दरम्यान त्यांनी आज पहाटे शिर्डी येथे सुरू असलेल्या अधिवेशनात बोलत होते. ते पुढे म्हणाले की मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचे कोणीच समर्थन करीत नाहीत.ज्यांनी देशमुख यांची हत्या केली त्यांना फाशीवर लटकवले पाहिजे.असे देखील त्यांनी आज रविवारी हे दुपारी वक्तव्य केले आहे.दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याला दीड महिना उलटून गेला आहे.पण मंत्री धनंजय मुंडे यांनी देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही.फक्त ते माध्यमांसमोर असं वक्तव्य करत आहेत.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसांचे शिबिर सुरू आहे.आज पहाटे धनंजय मुंडे यांनी येथे आज हजेरी लावली आहे.