पुणे दिनांक १९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक गोव्यातून खळबळजनक अपडेट आली असून.अनेकजण हे गोव्यात पर्यटना साठी मोठ्या संख्येने जातात .व गेल्यानंतर तेथे पॅराग्लायडिंगचा आनंद घेत असतात.पण मात्र गोव्यात पॅराग्लायडिंग करताना एक दुर्घटना घडली आहे.या दुर्दैवी दुर्घटना मध्ये पुण्यातील एक पर्यटक महिलेचा मृत्यू झाला आहे.व पायलटचा देखील मृत्यू झाला आहे.१) शिवानी दाभाळे (वय २६) २) पायलट सुमल नेपाळी (वय २६) अशी मृतांची नावे आहेत.पुण्याहून गोव्याला फिरण्यासाठी महिलांचा एक ग्रूप आला होता.दरम्यान काल शनिवारी सायंकाळी शिवानी व पायलट सुमलने 🗻 डोंगरावरून उड्डाण केले.पण त्यांचे पॅराग्लायडर दरीत कोसळून ही दुर्घटना घडली आहे.