पुणे दिनांक १९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट आली असून उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यातील तंबूना आग लागली होती.त्या संदर्भात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी प्रयागराज येथे घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांना फोन करून या घटनेची माहिती घेतली आहे.तसेच महाकुंभ मेळाव्यात लागलेल्या आगीबाद्दल विचारपूस केली आहे.दरम्यान या आगीत १० ते १५ तंबू ⛺ जळून खाक झाले आहेत.व तंबू मधील सामान जळून खाक झाले आहे.या व्यतिरिक्त कोणीही जखमी झालेले नाही.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.