पुणे दिनांक २० जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली असून.पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होताच महायुतीत मधील वाद चव्हाट्या वर आला आहे.त्यामुळे आता शिवसेना मधील भुसे व भरत गोगावले हे नाराज झाले आहेत.व तशी नाराजी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून देखील दाखवली आहे.त्यामुळे आता रायगड व नाशिक येथील पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.दरम्यान रायगड येथील पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाच्या आदित्य तटकरे यांना देण्यात आले आहे.त्यामुळे आता शिवसेनेचे भरत गोगावले हे चांगलेच नाराज झाले आहेत.तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपचे गिरीश महाजन यांना दिल्यानंतर आता नाशिकचे भुसे हे नाराज झाले आहेत.त्यांनी नाशिक येथील पालकमंत्रीपदासाठी दावा केला होता.त्यामुळे आता महायुतीत नाराजी नाट्य निर्माण झाले आहे.तर शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाले आहेत व ते आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी निघून गेले आहेत.यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता रायगड व नाशिक येथील दोन्ही पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली आहे.तसेच पुढील आदेश प्राप्त होऊ पर्यंत या दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्रीपद हे आता रिक्त राहणार आहेत.