पुणे दिनांक २० जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.महायुतीत पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीत नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणावर चव्हाट्यावर आले आहे.दरम्यान रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांना तर नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रीपद हे भुसे यांना न मिळाल्याने ते दोघेजण नाराज झाले आहेत. त्या दोघांनी तशी नाराजी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून देखील दाखवली आहे.त्यामुळे आता रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांना न मिळाल्याने तेथील एकूण ३८ शिवसैनिक यांनी राजीनामा दिला आहे.तसेच रस्ता रोको आंदोलन देखील केले होते.त्यामुळे आता स्व:ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालकमंत्रीपदावरुन नाराज आहेत.अशी चर्चा सुरू आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे हे अचानकपणे सातारा जिल्ह्यातील दरे गावी निघून गेले आहेत.