पुणे दिनांक २५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक उत्तरप्रदेश प्रयागराज येथील कुंभमेळातून आली आहे.हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला किन्नर आखाड्याने महामंडलेश्वर बनवल्याने आता सर्व हिंदू धर्मातील साधूसंत हे नाराज झाले आहेत.तसेच शांभवी पीठाधीश्र्वर श्री स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी याबाबत प्रचंड प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे. ते यावेळी असे देखील म्हणाले की मागील कुंभमेळ्यात किन्नर आखाड्याला मान्यता देऊन मोठे पाप झाले आहे.ही जी काही अनुशासनहिनता घडत आहे ती खूप मोठी धोकादायक आहे.हा सनातन धर्माशी विश्र्वासघात आहे.ही फसवणूक आहे.या लोकांच्या जाळ्यात अडकू नकोस.असे मी अभिनेत्री ममता कुलकर्णीला सांगितले होते.असे देखील त्यांनी म्हटले आहे.