पुणे दिनांक २६ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून आरोग्यासंबधी मोठी अपडेड आली असून.पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम. या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यात आता या रुग्णांचा आकडा ७३ च्या पुढे गेला आहे.यात एकूण २५ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.तर यातील काही जणांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे.तर एकूण १४ रुग्ण हे अद्याप व्हेंटिलेटरवर आहेत . दरम्यान या रुग्णांत सिंहगड रोड भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.
दरम्यान जेबीएसच्या पुण्यातील वाढत्या रुग्णांची केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने दखल घेण्यात आली आहे.दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या मदतीसाठी एक युनिट पुण्यात दाखल झाले आहे.कालप्रर्यत १० रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.तर अद्याप १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत .आज पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा युवक सोलापूर मधील होता तो पुण्यातील धायरी भागातील डीएसके विश्र्व या ठिकाणी राहत होता.त्याची तबेत खालावल्याने त्याला उपचारासाठी सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्याला श्र्वासनचा त्रास झाल्याने या युवकाचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.दरम्यान हा महाराष्ट्रातील जीबीएस रुग्णांचा पहिला मृत्यू झाला आहे.