पुणे दिनांक २६जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक नाशिक मुंबई महामार्गावर एक भीषण अपघाताची अपडेट आली असून यात कसारा घाटात खासगी मिनीबसला भीषण अपघात झाला या अपघातात बस मधील २१ जण हे गंभीर रित्या जखमी झाले असून.यातील ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे
मुंबई ते नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा घाटात हा अपघात झाला असून मिनीबस वरील चालकाचा ताबा सुटल्याने हा ही बस उलटली असे घटनास्थळावरुन सांगण्यात आले आहे.दरम्यान यातील सर्व प्रवासी हे मुंबईवरून सिन्नरला लग्नासाठी जात असताना हा कसारा घाटात अपघात झाला असून यात २१ जण जखमी झाले असून यातील ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.