पुणे दिनांक २७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळी एक अपडेट पुणे येथूनच आली आहे.गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराने पुणे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे चांगलेच टेंशन वाढविले आहे.या रुग्णांची दिवसां दिवस वाढ प्रचंड प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे.त्यातच आता या रुग्णांची संख्या १०१ झाली आहे.तर १०१ शतक पार केले आहे.दरम्यान ६२ रुग्ण हे पुणे ग्रामीण तर पुणे महापालिकेच्या भागात १४ तर पिंपरी चिंचवड मध्ये ६ अशी संख्या आहे.या रुग्णात पुरुष संख्या ही ६८ आहे.तर पुरुष रुग्णांची संख्या ही ३३ आहे.या आजाराचा पहिला बळी हा शनिवारी सोलापूरात गेला आहे.दरम्यान या पुणे महापालिकेच्या भागातील रुग्णां वर पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.तर पिंपरी चिंचवड येथील रुग्णांवर आता यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.हे दोन्ही महानगरपालिकेच्या वतीने मोफत मध्ये केले जाणार आहेत.यासाठी आयसीयू वार्ड तयार करण्यात आले आहे.तसेच जनरल वार्ड देखील राखीव करण्यात आले आहे.दरम्यान या आजाराचे रुग्ण हे खडकवासला रोडवरील धायरी तसेच किरकिटवाडी या भागात जास्त प्रमाणावर आढळून आले आहेत.सोलापूर येथे मयत झालेला रुग्ण देखील हा धायरी येथील होता.तो गावी सोलापूर येथे गेल्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता.उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.