Home Breaking News पुण्यात खूनाचे सत्र सुरूच कोंढव्यात मध्यरात्री सिमेंटचा ब्लाॅक डोक्यात घालून सराईत गुन्हेगाराने...

पुण्यात खूनाचे सत्र सुरूच कोंढव्यात मध्यरात्री सिमेंटचा ब्लाॅक डोक्यात घालून सराईत गुन्हेगाराने केला खून

49
0

पुणे दिनांक २७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक खळबळजनक अपडेट आली असून.पुण्यात खूनाचे सत्र सुरूच आहे. ते थांबायचे काय राहत नाही.पुण्यातील कोंढवा भागात आज सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास साडे तीन वाजण्याच्या दरम्यान एका युवकाचा खून करण्यात आला आहे.असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.कोंढवा पोलिसांनी 👮 या खूना बाबत एकाला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान या खूनप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कोंढव्यातील दशक्रिया विधी भैरवनाथ मंदिरा  समोर युवकाची हत्या करण्यात आली आहे.यात प्रथम त्याला मारहाण करण्यात आली तसेच काठीने मारहाण केली तसेच त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लाॅक घातल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.मृत व्यक्तीचे नाव मल्लेश कोळी ( रा.आर .के.काॅलनी . गोकुळ नगर कोंढवा पुणे) असे आहे.दरम्यान या हत्याच्या आरोपावरून दोन सराईत गुन्हेगाराना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

Previous articleअंजली दमानिया आज थोड्याच वेळात घेणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट
Next articleसर्वोच्च न्यायालयात आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here