पुणे दिनांक २९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात आज बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत एकूण ३० भाविकांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे तर ९० जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे.तर यात मृत्यूमुखी पडलेल्या एकूण २५ भाविकांचे मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.आज मौनी अमावस्या निमित्ताने महाकुंभ मेळाव्यात त्रिवेणी संगमावर काल सायंकाळ पासून करोडो लोकांनी पवित्र स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.पण मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली व यात मोठी दुर्घटना घडली आहे.
दरम्यान आज प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांनी आपल्या जीवलगांना गमावल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे.दरम्यान या घटनेनंतर त्यांचे डोळे रडून -रडून त्यांच्या डोळ्यातील पाणी आटले होते .दरम्यान या वेळी तिथे वार्तांकन करणां-या पत्रकार यांना देखील रडू कोसळले आहे.आता यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.दरम्यान प्रयागराज येथील सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यात एकूण ३० भाविकांचा मृत्यू झाला आहे.तर ९० भाविक हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान आजच्या घटनेला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार हे स्पेशल फेल झाल्यानेच ही घटना घडली आहे.असा सोशल मीडियावर सरकार विरोधात अनेकांनी तीव्र भावना व संताप व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर येथील घाटावर अनेकांचे कपडे तसेच चप्पल व बुट यांचा मोठ्या प्रमाणावर खच पडलेला आहे.