पुणे दिनांक ३० जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.वाॅशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकेन एयरलाइन्सचे एक विमान व हे हवतेच हेलिकॉप्टरला धडकले आहे.सदरच्या दुर्घटना नंतर तातडीने या परिसरातील सर्वच उड्डाणे रोखण्यात आले आहे. तसेच तातडीने आपात्कालीन मदत पथक रिगन नॅशनल एयरपोर्टवर दाखल झाले आहे.दरम्यान या विमानाची धडक झाल्यानंतर ते नदीत कोसळले आहे.सदरच्या विमानात एकूण ६० प्रवासी होते.तर धडक झालेल्या हेलिकॉप्टर मध्ये अमेरिकेन लष्कराचे तीन जवान होते असेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.