पुणे दिनांक ३१ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातील स्टेडियमवरुन एक अपडेट आली असून.पुण्यातील स्टेडियमवर आज शुक्रवारी सायंकाळी झालेल्या टी-२० चौथा सामन्यात भारतीय क्रिकेट 🏏 संघाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे.दरम्यान नाणेफेक इंग्लंडने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.प्रथम फलंदाजी करताना भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने इंग्लंड समोर १८२ धावांचे लक्ष्य दिले होते.परंतू इंग्लंड च्या संघाला ते आव्हान पार करता आले नाही.दरम्यान आज पुण्यातील स्टेडियमवर फलंदाजी करताना हार्दिक पांड्याने व शिवम दुबे यांनी शानदार खेळी करून प्रत्येकी ५३ धावा केल्या.