पुणे दिनांक ३ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक पुण्यातूनच खळबळ जनक अपडेट हाती आली असून. महाराष्ट्रातील गुलियन बॅरे सिंड्रोम ग्रस्त अर्थात (जीबीएस) रुग्णांची संख्या १५८ वर पोहोचली आहे.काल रविवारी दिवस भरात यात तीन नवीन संशयित रुग्णांची वाढ झाली आहे.यातील बहुतांश रुग्ण हे पुणे परिसरातील आस पासच्या भागातील आहेत.आताप्रर्यंत राज्यात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर १२८ जणांना जीबीएसचे निदान झाले आहे.दरम्यान आतापर्यंत जीबीएस या आजारावर यशस्वी मात केली आहे.४८ रुग्ण हे आयसीयूमध्ये तर २१ जण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.यातील काही रुग्णांना उपचारा नंतर ससून रुग्णालयातून काल डिस्चार्ज देण्यात आला आहे.