पुणे दिनांक ३ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही धाराशिव जिल्ह्यातून आली असून.धाराशिव जिल्हा येथील तांदुळवाडीत बचत गटाच्या एकूण ४० महिलां ना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.दरम्यान या फसवणूक प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिलांची फसवणूक झाल्यानंतर सदरचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या बचत गटाच्या महिलांना काळ्या जादूची भीती दाखवली जात आहे.या महिलांच्या घरात 🍋 लिंबू.सुया.तसेच राख टाकण्याची घटना देखील घडली आहे.तसेच वंशाचा दिवा संपविण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान घरांमध्ये राख व लिंबू टाकण्याची घटना सीसीटीव्हीत कैद देखील झाली आहे.दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.