Home Breaking News शिर्डीत साईसंस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा 🗡️ चाकूने भोसकून खून , दुहेरी हत्याकांडाने शिर्डी...

शिर्डीत साईसंस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा 🗡️ चाकूने भोसकून खून , दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली

47
0

पुणे दिनांक ३ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीतून आली आहे.शिर्डी येथे साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्यावर चाकूच्या सहाय्याने हल्ला करुन त्यांचा निर्घृणपणे खून केला आहे.दरम्यान सदर दुहेरी हत्याकांडाबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.आज सोमवारी पहाटेच्या सुमारास शिर्डी येथे मंदिरात कामावर दोघे जण जात असताना ही धक्कादायक व खळबळजनक घटना घडली आहे.दरम्यान शिर्डीत आणखी एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला असून तो गंभीर रित्या जखमी झाला आहे.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ‌दरम्यान या तिन्ही घटना वेग वेगळ्या आहेत.तसेच तिन्ही घटनांमध्ये एकच साम्य आहे का? आता या दुष्टीने शिर्डीचे पोलिस तपास करीत आहेत.दरम्यान या घटनेनंतर शिर्डी येथील नागरिकांनमध्ये व भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.व त्यांच्यात असुरक्षितेचे आवाहन आहे. दरम्यान शिर्डी या ठिकाणी अनेक परराज्यातील काही गुन्हेगार यांनी येथेच तळ ठोकून आहेत.व अशा गंभीर घटना घडत आहेत.आता या सर्व घटनेकडे अहिल्या नगरे पोलिस अधीक्षक हे किती गांभीर्याने पाहतात हे पहाणे म्हत्वाचे ठरणार आहे.

Previous articleबचत गटाच्या महिलांना लाखों रुपयांचा गंडा,वंशाचा दिवा संपविण्याची दिली धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here