पुणे दिनांक ४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे मंत्रीपदाच्या लायकीचे नाहीत त्यांचा लवकरात लवकर राजीनामा घ्यावा.अशी मागणी आज पत्रकार परिषदेत आज मागणी केली आहे.दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत दमानिया यांनी काही खळबळजनक आरोप देखील मुंडे यांच्यावर केले आहेत.मागील महायुती मध्ये धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहीनेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी हा घोटाळा केला आहे.हा सगळा मिळून जवळपास एकूण ३०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा यावेळी पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी केला आहे.दरम्यान या पत्रकार परिषदे नंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.