पुणे दिनांक ६ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातून खळबळजनक अपडेट आली असून.संजीवराजे निंबाळकरांच्या पुणे येथील प्रभात रोडवरील लक्ष्मी निवासस्थानी सलग दुसऱ्यादिवशी चौकशी सुरूच आहे.दरम्यान काल बुधवारी दिनांक ५ फेब्रुवारी सकाळी सहा वाजल्या पासून निंबाळकरांच्या फलटण.पुणे.मुंबई तसेच फलटण येथील दुध डेअरी मध्ये आयकर खात्याची धाड पडली आहे.दरम्यान १७ तासांपेक्षा अधिकच्या चौकशी नंतर फलटण येथील निवासस्थानातून आयकर खात्याचे अधिकारी बाहेर पडले आहे.मात्र पुण्यातील प्रभात रोडवरील लक्ष्मी निवासस्थानी सलग दुसऱ्यादिवशी आयकर विभागाच्या वतीने आज पुन्हा चौकशी सुरूच आहे.दरम्यान सदरची तपासणी किती वेळ चालेल? या बाबत अद्याप कोणतीही प्रकारची माहिती समोर आली नाही.दरम्याध संजीवराजे हे रामराजे निंबाळकर यांचे चुलत भाऊ आहेत.तर विधानसभा निवडणुकीत रामराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटातून बाहेर पडून जेष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.व त्यांनी महाविकास आघाडीचे काम केले होते.दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता आयकर विभागाच्या वतीने त्यांच्या चुलत भावाच्या फलटण .पुणे.तसेच मुंबई व फलटण येथील दुध डेअरीवर छापेमारी करण्यात आली आहे.त्यामुळे राजकीय द्वोषातून सदरची कारवाई करण्यात आली आहे.असे निंबाळकर यांचे कार्यकर्ते माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.