कौटुंबिक न्यायालयात करुणा शर्मा जिंकल्या, मंत्री धनंजय मुंडेंना पोटगी देण्याचे आदेश,’दोन तासांमध्ये मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ‘- अंजली दमानिया
पुणे दिनांक ६ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा शर्मा यांनी मुंबई येथील वांद्रे कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता.आज त्या दाव्याचा निकाल लागला आहे.यात न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचे मान्य केले आहे.करुणा मुंडे ह्या पोटगी साठी पात्र असून.त्यांना महिन्याला १ लाख २५ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच मुलगी शिवानीला लग्नापर्यंत महिन्याला ७५ हजार देण्याचा आदेश देण्यात आला आहे.दरम्यान न्यायालयात अर्ज दाखल केल्यापासून पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले आहे.दरम्यान करुणा शर्मा व धनंजय मुंडे यांनी ९ जानेवारी १९९८ रोजी प्रेम विवाह केला होता.२०१८ नंतर धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे.धनंजय मुंडे यांनी दुसरी पत्नी राजश्री सोबत विवाह केला आहे.
दरम्यान आज कौटुंबिक न्यायालयात आज करुणा शर्मा यांनी दावा जिंकल्या नंतर दोन तासांच्या आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यांनी केला आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे की.एखाद्यांचा पापाचा घडा भरला की परमेश्वर देखील दिशा देतो.अतिशय धक्कादायक अशी कौटुंबिक न्यायालयाची ऑर्डर आहे.दरम्यान घरगुती हिंसाचाराला करणा-याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आणखी किती काळ मंत्रीमंडळात ठेवणार? असा सवाल देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.