पुणे दिनांक ९ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक सकाळी राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.महायीतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रविवारी ६२ वा वाढदिवस आहे.त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातून त्यांना शुभेच्छा सकाळपासूनच देण्यात येत आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ-दीप या निवासस्थानाला आकर्षित अशी खास विद्युत रोषणाई तसेच मोठ्या प्रमाणावर फुलांची आरास करण्यात आली आहे.तसेच अनेक आमदार.खासदार . नगरसेवक.तसेच शिवसेना कार्यकर्ते व नेते मंडळी यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे.