पुणे दिनांक ९ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातून खळबळ जनक अपडेट आली असून.पुण्यातील कोंढवा भागातील सनश्री इमारतीला शाॅटसर्किटमुळे भीषण अशी आग लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.दरम्यान घटनास्थळी कात्रज अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना होऊन तातडीने सदर इमारतीला लागलेली आग 🔥 आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.
दरम्यान कोंढव्यातील सनश्री इमारतीला दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली.दरम्यान या आगीची माहिती नागरिकांनी पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या नंतर आता अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान सदरची आग ही शाॅटसर्किटमुळे किंवा घरातील गॅस सिलिंडर गळतीमुळे लागल्याची प्रथमदर्शनी शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान या इमारतीमधील नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर सुरक्षित रित्या काढले आहे.