Home क्राईम तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मिनीबसला भीषण अपघात ३ ठार तर...

    तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मिनीबसला भीषण अपघात ३ ठार तर १५ जण गंभीर रित्या जखमी

    56
    0

    पुणे दिनांक १० फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती एक खळबळजनक अपडेट ही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून आली आहे.तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मिनीबसला सोलापूर हायवेवर मोहोळ तालुक्यातील कोळसेवाडी येथे झालेल्या विचित्र अपघातात मिनीबसला भरघाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात बस ३ जणांचा मृत्यू झाला आहे तर बस मधील अन्य १५ प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.मिनीबस ही तुळजापूर येथील भवानी मातेच्या दर्शनासाठी जात असताना मोहोळ येथील कोळसेवाडी येथे प्रथम भरघाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली व नंतर मिनी बसला जोरात धडक दिल्याने बस पलटी होऊन भीषण असा अपघात झाला.यात मिनीबसचा चालक व अन्य दोन प्रवासी यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.तर बसमधील अन्य १५ प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघातानंतर मोहोळ पोलिसांनी 👮 पलटी झालेली बस ट्रेनच्या सहाय्याने बाजूला केली असून ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पुढील तपास मोहोळ पोलिस करत आहेत.

    Previous articleपुण्यातील निवासी इमारतीतील शाॅटसर्किटमुळे भीषण आग 🔥, अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
    Next articleनाराजी नाट्य नंतर भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे होणार विधानपरिषदेचे आमदार?

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here