पुणे दिनांक ११ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील सर्व पोलिस यंत्रणा कामाला लावणारा कोण आहे हा हाफकिन? असा सनसनित टोला शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे.दरम्यान सोमवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा ऋषिकेश शेठ घरातून नाराज होऊन थेट खासगी कंपनीचे विमान पुण्यातून घेऊन थेट पुण्यातून बॅकाॅक येथे फिरायला चालला होता.इकडे पुण्यात सर्व पोलिस यंत्रणा कामाला लावून माजी आरोग्यमंत्र्यांनी पुणे येथील सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये तातडीने किडनॅपिंगची केस दाखल करुन पुण्यातील जाॅइन्ट सिपीसह सर्व पोलिस यंत्रणा कामाला लावून ते पुणे येथून बॅकाॅकला गेलेले खासगी कंपनीचे विमान हे तातडीने चेन्नईत उतरविण्यात आले.हे विमान पुन्हा चेन्नई वरुन पुण्याला साडेनऊ वाजता आणण्यात आले आहे.दरम्यान महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने सावंत हे अशाच प्रकारे नागपूर येथील अधिवेशनातून बॅगा भरून तातडीने अधिवेशनातून निघून गेले होते.असे देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.