पुणे दिनांक ११ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातून येत आहे.राहुल सोलापूरकर यांच्यावर अॅट्राॅसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज पुण्यात राहुल सोलापूरकर याच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे.व ते आक्रमक झाले आहेत.व त्यांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतू पोलिसांनी 👮 त्यांना अडवले आहे.तर हे आंदोलक आत जाण्यासाठी ठाम आहेत.पोलिसांनी निवासस्थानी लावलेल्या बॅरिकेड्सवर कार्यकर्ते चढले आहेत.दरम्यान काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व घटनाकार डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या बाबत गंभीर असे वक्तव्य केले होते.त्यामुळे पुण्यातील वंचित बहुजन संघटनेच्या वतीने आज आंदोलन केले आहे.तसेच राहुल सोलापूरकर याला तातडीने अटक करा.असे आंदोलन कर्ते यांचे म्हणणे आहे.तर पोलिस सोलापूरकर याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.दरम्यान आता घटनास्थळी पोलिस हे आंदोलनकर्ते यांच्या बरोबर चर्चा करत आहेत.पण आंदोलनकर्ते हे निवासस्थानी आत घुसण्याचा प्रयत्न करत आहे.तसेच सोलापूरकर यांच्यावर आज गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात यावे.अशी मागणी आंदोलनकर्ते ठाम आहेत.