पुणे दिनांक १२ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत.तेव्हा महायुती मधील नेतेमंडळी यांनी आम्ही सत्तेत आल्यावर राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु असे म्हटले होते.आता राज्य सरकार हे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहे. का ? असा सवाल काॅग्रेस पक्षाचे सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत बोलताना हा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.दरम्यान पुढं बोलताना पाटील म्हणाले की महाराष्ट्रातील शेतकरी कर्ज चुकविण्याच्या स्थितीत नाही,जे होते ते देखील भारतीय जनता पार्टीच्या कर्जमाफीच्या घोषणा नंतर चुकवत नाही आहेत.त्यामुळे आता महायुतीच्या सरकार हे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार की नाही? ते स्पष्ट करावे, नाही तर ही घोषणा फक्त निवडणुका जिंकण्यासाठी होती, असं आता जाहीर करावे,असेही खासदार विशाल पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.