Home कृषी महायुतीच्या लाडक्या बहिणींमुळे जगाचा पोशिंदा शेतकरी संकटात

    महायुतीच्या लाडक्या बहिणींमुळे जगाचा पोशिंदा शेतकरी संकटात

    54
    0

    पुणे दिनांक १२ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक खळबळजनक अपडेट महाराष्ट्र मधून येत आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभांच्या निवडणूक मध्ये महायुतीच्या नेत्यांनी आपले सरकार सत्तेवर येण्यासाठी लाडक्या बहिणींनकडून राख्या बांधून घेतल्या व त्यांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले.याचा फायदा देखील मोठ्या प्रमाणावर महायुती सरकारला झाला देखील.तर दुसरीकडे जगाचा पोशिंदा शेतकरी मात्र मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे.आता तसे चित्रच स्पष्ट झाले आहे.कारण मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारे ठिबक सिंचन अनुदान हे या महायुती सरकारने थांबवले आहे.  दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये तब्बल ५ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान थकले आहे.दरम्यान कृषी विभागाच्या वतीने आता निधीच मिळत नाही.त्यामुळे आता शेतकऱ्यांना पैसे द्यायचे कुठून? असा गंभीर प्रश्न आता कृषी विभागाला पडला आहे.तर महाराष्ट्राचे कृषी मंत्री देखील या गंभीर प्रश्नांबाबत बघ्याची भूमिका घेत आहेत.तसेच शेतकरी संघटना आता या प्रश्नावर महायुती सरकारच्या विरोधात आवाज उठवणार का? येणाऱ्या काळात हे स्पष्ट होईल.

    Previous articleबीडमध्ये तब्बल ८२ दिवसांनंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फडवर गुन्हा दाखल
    Next articleराज्यात GBS ची रुग्णसंख्या पोहोचली २००च्या पार ,२० रुग्ण व्हेंटिलेटरवर

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here