पुणे दिनांक १४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट ही दिल्ली येथून आली असून.बनावट दिव्यांग प्रमाणपत्र व नावात बदल करून आयोगाची फसवणूक केलेल्या बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला काही काळासाठी पून्हा एकदा दिलसा मिळाला आहे. दरम्यान आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने पूजाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली.आज च्या सुनावणी दरम्यान पूजा खेडकर हिला १७ मार्च पर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.तर आता या प्रकरणात पुढील सुनावणी १७ मार्च रोजी होणार आहे.