पुणे दिनांक १५ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यातून येत आहे.दरम्यान उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा सुरू आहे. त्यामुळे प्रयागराज येथे भाविकांची अलोट अशी गर्दी पाहायला मिळत आहे.आज शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी पर्यंत त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्या साठी कोट्यवधींच्या संख्येने भाविक आले आहेत. दरम्यान कालपर्यंत सदरचा आकडा हा ४६ ते ४८ करोड असा होता.आता त्या आकडेवारी मध्ये वाढ झाली असून आतापर्यंत ५० कोटींपेक्षा जास्त भाविकांनी महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले आहे. दरम्यान दिनांक २६ फेब्रुवारीला हा आध्यात्मिक सोहळा संपण्याची शक्यता आहे.