Home भूकंप आज पहाटेच भूकंपाने दिल्ली हादरली,४.० रिश्टर स्केलचा भूकंप पहाटेच लोक घराबाहेर पळाले

आज पहाटेच भूकंपाने दिल्ली हादरली,४.० रिश्टर स्केलचा भूकंप पहाटेच लोक घराबाहेर पळाले

104
0

पुणे दिनांक १७ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.आज सोमवारी सकाळी पहाटे ५.३६ मिनिटांनी तब्बल ४.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.सदरचा भूकंप हा  दिल्ली एनसीआर मध्ये झाला आहे.दरम्यान सदरच्या भूकंपानंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांने  या भूकंपाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी मिडिया बरोबर बोलताना म्हणाले आहे की.माझ्या आयुष्यात प्रथमच हा भूकंप पाहिला आहे.अक्षरश: धडकी भरेल असा हा भूकंप होता.तर दुसऱ्या प्रवाशाला वाटले की जणू काय ट्रेनच कोसळली आहे.

दरम्यान या भूकंपानंतर दिल्ली एनसीआर मध्ये सर्वत्र  नागरिकांमध्ये पहाटे झोपेतच असताना हा भूकंप झाला आहे.त्यामुळे सगळेजण घाबरून घराच्या बाहेर पडले.भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे.तर काहीजण पहाटेच घर सोडून रस्त्यावर येऊन उभे राहिले दरम्यान असा भूकंप प्रथमच अनुभवला असे येथील नागरिकांनी सांगितले आहे.दरम्यान फोटो मध्ये नागरिकाचे घराबाहेर पडताना दृश्य दिसत आहे.

Previous articleशेतकऱ्याच्या उसाच्या फडाला भीषण आग, 🔥 आगीत १०० एकर ऊस जळून खाक लाखोंचे नुकसान!
Next articleपिंपरी -चिंचवड मध्ये पेट्रोल पंपावर चक्क देण्यात आले पाणी एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here