Home क्राईम देहूरोड गोळीबार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाकडून ७ दिवसांची पोलिस कस्टडी

    देहूरोड गोळीबार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाकडून ७ दिवसांची पोलिस कस्टडी

    58
    0

    पिंपरी -चिंचवड १८ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) देहूरोड येथील आंबेडकर नगर येथे १३ फेब्रुवारी रोजी वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबर करुन खून करून फरार झालेल्या आरोपींना देहूरोड पोलिसांनी सोलापूर येथून मुसक्या आवळून आज मावळ येथील न्यायालयात हजर केले असता दोन आरोपींना न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कस्टडी दिली आहे.सदरचे आरोपी हे दिनांक २४ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कस्टडीत रहाणार आहेत.दरम्यान आता पर्यंत एक महिला व दोन पुरुष यांना अटक करण्यात आली आहे.तर यातील आणखी एक आरोपी फरार आहे.

    दरम्यान आज न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेल्या दोन आरोपींची नावे १) शाबीर समीर शेख (वय २४ रा.देहूरोड जि.पुणे) २) जाॅन उर्फ साईतेजा शिवा चितामला (वय २४ रा.देहूरोड जि.पुणे ) अशी आहेत. दरम्यान या प्रकरणी देहूरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहिती नुसार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी देहूरोड येथील आंबेडकर नगर येथे वाढदिवसाच्या पार्टीचा कार्यक्रम सुरू असताना आरोपी यांनी तीन जणांना मारहाण करून रिव्हाॅलवर मधून चार गोळ्या झाडल्या सदर गोळीबारात विक्रम रेड्डी यांना गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता तर नंदकिशोर यादव हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.गोळीबार केल्यानंतर आरोपी पळून गेले होते.दरम्यान देहूरोड पोलिसांनी आरोपींना सोलापूर येथून मुसक्या आवळून अटक करून मावळ येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.याबाबतचा पुढील तपास देहूरोड पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे हे करीत आहेत.

    Previous articleपुण्यातील कुंजीरवाडी येथील मटका जुगार अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांचा छापा, तीन जणांच्या आवळल्या मुसक्या
    Next articleबोला.. छत्रपती शिवाजी महाराज की…जय!, शिवनेरीवर शिवजयंतीचा शासकीय सोहळा सुरू

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here