Home कृषी राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी चक्क मंत्रीमंडळात निर्णय झाल्याचा बनाव करून,...

    राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी चक्क मंत्रीमंडळात निर्णय झाल्याचा बनाव करून, तब्बल ५०० कोटी रुपये मंजूर करून घेतले -अंजली दमानिया

    44
    0

    पुणे दिनांक १९ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आणखी एक मोठा प्रताप केला आहे.आता या मोठ्या घोटाळ्यामुळे ते आणखी गोत्यात येण्याची दाट शक्यता आहे.दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मुंडे हे कृषीमंत्री असताना मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याचे खोटेपत्र तयार करून तब्बल ५०० कोटी रुपये मंजूर करून घेतले.असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अन्नधान्य व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.

    दरम्यान आज बुधवारी थोड्याच वेळापूर्वी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावा केला आहे.त्या म्हणाला की यापुर्वी मी वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांचे संबंध दाखवले तसेच वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे हे कंपन्यांत एकत्र  आहे.हे सांगितले तसेच ऑफिस व प्राॅफिट दाखवून दिला, त्यानंतर ४ दिवस थांबून कृषी घोटाळा काढला तरीही सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही,त्यावर अंजली दमानिया म्हणाल्या की आज मी सांगत आहे. तो कृषी घोटाळा नंबर २ आहे.या घोटाळ्यात मंत्री धनंजय मुंडे कुठेही वाचणार नाही.दरम्यान मंत्री मंडळाच्या बैठकीत ज्या विषयाला मंजुरीच मिळाली नाही.त्याच विषयावर एक पत्र काढून ५०० कोटी रुपये मंजूर करून घेतले मंत्री धनंजय मुंडे यांचे एक तारीख नसलेले पत्र आहे.त्यात त्यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आलेला विषय मंजूर झाल्याचे म्हटले आहे. व त्याच आधारे जीआर काढायला लावला.यावेळी पुढे बोलताना दमानिया म्हणाल्या की ११ तारखेला जीआर काढण्यात आला.त्यावर अतिरिक्त ५००कोटी रुपये मागण्यात आले आहेत.प्रकाश सापळे, रासायनिक खते.तसेच बॅटरीवर चालणारे पंप.बियाणे प्रक्रिया यंत्र स्पायरल ग्रेडर.सोयाबीन स्टोरेज बॅग.इत्यादी वस्तू साठी हे पैसे मंजूर करण्यात आले.असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

    Previous articleजुन्नर येथे शिवनेरीवर मधमाश्यांच्या हल्ल्यात १०जण जखमी
    Next articleआज पहाटे कोकणात रायगड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here