Home क्राईम राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक कोर्टाने सुनावली २ वर्षांची शिक्षा...

    राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक कोर्टाने सुनावली २ वर्षांची शिक्षा ५० हजार रुपये दंड

    65
    0

    पुणे दिनांक २० फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही नाशिक येथून राजकीय वर्तुळातून आली असून.  महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांचा कारावास व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा आज कोर्टाने सुनावली आहे.दरम्यान हे प्रकरण १९९५ सालचे आहे.कागदपत्रा मध्ये फेरफार करून करून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.यासंदर्भात  माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्या याचिके वर आज नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात निकाल दिला आहे.दरम्यान माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटातून राज्याचे कृषिमंत्री आताच्या सरकार मध्ये आहेत.आता आजच्या निकालामुळे कदाचित त्यांचे आमदार व मंत्रीपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आता या सर्व घडामोडी पाहता माणिकराव कोकाटे हे स्वतः कृषी मंत्रीपदाचा राजीनामा देतात का? हे लवकरच स्पष्ट होईल.

    Previous articleउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी ईमेल मंत्रालयात एकच खळबळ
    Next articleपुणे ते सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी येथील १२ फाटा येथे पोलिसांनी 👮 २ लाख ७८ हजार रुपयांची गावठी दारू पकडली एकजण गजाआड

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here