पुणे दिनांक २१ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज शुक्रवार २१ फेब्रुवारी पासून दहावी ची परीक्षेला सुरूवात होत आहे.दरम्यान आजच्या परिक्षेला राज्यातील एकूण १६ लाख विद्यार्थी हे परिक्षा देणार आहेत.आजपासून सुरू होत असलेले दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी व अनुदानित व खासगी व्यावस्थापणच्या २३ हजारांहून अधिक शाळांनी तयारी केली आहे.
दरम्यान राज्यातील एकूण ९ विभागातील एकूण ५ हजार १३० केंद्रावर आजपासून परिक्षा सुरू होत आहे.दरम्यान आजच्या परिक्षेत राज्यातील १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. यात ८ लाख ६४ हजार १२० मुले.तसेच ७ लाख ४७ हजार ४७१ मुली व १९ तृतियपंथीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.दरम्यान काॅपीमुक्त परिक्षेसाठी ड्रोन कॅमेरा 📷 व व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.तर बैठी पथके व २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेपर व्यवस्थित लिहा.परिक्षेला जाताना प्रवेशपत्र बरोबर घेऊन जा.