पुणे दिनांक २२ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात GBS आजाराने नागरिकांची चिंता अधिक वाढवली आहे.दरम्यान आता या आजाराने नागपूरात तिसरा बळी घेतला आहे.यातील मृत व्यक्ती हा मूळचा राहणारा मध्यप्रदेश येथील आहे. त्याला प्रकृती खालावल्याने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याची काल शुक्रवारी तबेत मोठ्या प्रमाणावर खालवली व त्याचा मृत्यू झाला आहे.दरम्यान नागपूरात GBS चे आतापर्यंत एकूण २१ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात मृतांची संख्या ही १२ वर पोहोचली आहे.