पुणे दिनांक २३ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) चॅम्पियन ट्रॉफीत आज दुबईत झालेल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे.दरम्यान टाॅस जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर २४२ धावांचे लक्ष्य ठेवले होते.भारतीय क्रिकेट संघाने ६ गडी राखून हे आव्हान पूर्ण केले आहे.तसेच विराट कोहलीने १०० शतक पूर्ण केले आहे.दरम्यान पाकिस्तान हा संघ दोन सामन्यांत पराभूत झाल्याने जवळपास चॅम्पियन ट्रॉफीतून बाहेर पडला आहे.तर भारतीय क्रिकेट संघाचे आतापर्यंत सलग दोन सामने जिंकून सेमीफायनल मध्ये दाखल झाला आहे.