Home क्राईम मस्साजोगचे गावकरी आंदोलनावर ठाम, उद्या सकाळी १० वाजल्यापासून करणार अन्नत्याग आंदोलन

    मस्साजोगचे गावकरी आंदोलनावर ठाम, उद्या सकाळी १० वाजल्यापासून करणार अन्नत्याग आंदोलन

    188
    0

    पुणे दिनांक २४ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सर्व गावकरी हे आंदोलनावर ठाम असून उद्या मंगळवारी दिनांक २५ फेब्रुवारी सकाळी दहा वाजल्यापासून मस्साजोग गावात अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे.आज सोमवारी सायंकाळी त्याबाबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती.सदरच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान या बाबत आज तसे निवेदन गावकऱ्यांच्या वतीने बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत यांना देण्यात आले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी हे अद्याप फरार आहेत. तसेच पोलिसांनी 👮 आरोपींना मदत केली आहे.त्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी.तसेच या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना मदत करणा-यांवर सह आरोपी म्हणून त्यांना ताब्यात घ्यावे अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या गावकऱ्यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे केल्या आहेत.

    Previous articleगजानन मारणे पुणे पोलिसांना शरण पोलिसांनी केली अटक,जोग मारहाण प्रकरण
    Next articleआज सकाळी पश्चिम बंगाल कोलकात्यासह ओडिशामध्ये भूकंप, समुद्राच्या आत जमीन हादरली

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here