Home राजकीय आज मंगळवारी कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले महत्वपूर्ण निर्णय, राष्ट्रवादीचे दोन कॅबिनेट...

    आज मंगळवारी कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले महत्वपूर्ण निर्णय, राष्ट्रवादीचे दोन कॅबिनेट मंत्र्यांची बैठकीला दांडी

    84
    0

    पुणे दिनांक २५ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट मुंबईवरून आली असून.आज मंगळवारी कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली आहे.सदर बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार . तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हजर होते.आज च्या बैठकीत राज्य आधारसामग्री धोरणास मान्यता. राज्य डेटा प्राधीकरण स्थापन करणार . मुख्य सचिवा च्या अध्यक्षतेखाली नियामक समिती.बारामतीत नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी.५६४.५८ कोटी मंजूर.

    दरम्यान परळीत देखील नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी.५६४.५८ कोटी मंजूर. महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम १८ (३) १९५५ मध्ये सुधारणा.तसेच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश २०२५ ला मान्यता देण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील तालुका मुळशी पौड येथे लिंक कोर्ट ऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम न्यायालयाची स्थापना करण्या करिता मान्यता देण्यात आली आहे.ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम.महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान आजच्या कॅबिनेटच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कृषीमंत्री माणिक राव कोकाटे व अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे दोघांजणांनी दांडी मारली आहे.तर मागच्या मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीला देखील धनंजय मुंडे यांनी दांडी मारली होती.

    Previous articleमध्यरात्रीच्या सुमारास चाकणमधील कुटूंबावर 🔪 चाकूने भोसकून दरोडा,सोने व रोकड दरोडेखोरांनी पळवली एकच खळबळ
    Next articleशिवण्यात पूर्ववैमनस्यातून एकाचा पोटात धारदार शस्त्राने वार करुन खून

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here