पुणे दिनांक २६ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज महाशिवरात्री हा पवित्र दिवस आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणावर शिवमंदिरात दर्शना करिता गर्दी करत आहेत.आज बुधवारी पहाटे पासून भाविकांनी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठी गर्दी केली आहे.दरम्यान दर्शना करिता मंदिर परिसरात भाविकांच्या मोठ्या प्रमाणावर रांग लागल्या आहेत. पूजा-यांनी पहाटेच शिवलिंगाची पूजा केली आहे.तर आज पवित्र दिवस असल्याने मंदिर सूंदर फुलांनी आणि विद्यूत रोषणाईने सजवण्यात आले आहे.
दरम्यान आज महाशिवरात्र.हिंदू धर्मातील महत्वाचा सण.संपूर्ण महाराष्ट्रात या खास दिवसाचा उत्साह पाहायला मिळतो .तर आज नाशिक बरोबर सर्वच ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे.आज अनेक भागातून शिवभक्त भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी नाशिक मध्ये दाखल झाले आहेत. जवळपास ५ तासांपासून हे भाविक दर्शनासाठी या रांगेत उभे आहेत.