पुणे दिनांक २७ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील स्वारगेट येथील एसटी बस स्थानकावर झालेल्या बलात्कारप्रकरणी आज राज्याचे गृहमंत्री राज्यमंत्री योगेश कदम हे आज पुण्यात दाखल झाले असून.थोड्याच वेळापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची गाडी त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आहे.त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना तातडीने अटक करण्यात आली आहे.यावेळी देसाई यांनी पुणे पोलिसांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.पोलिसांच्या १४ टीम काय करतात तसेच या बलात्कार मधील आरोपी सापडत नाही.आता आरोपी वर पुणे पोलिसांनी १ लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे.हा पोलिसांचा नाकर्तेपणा आहे.पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्याबाबत मी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना लोकशाही मार्गाने प्रश्न विचारला असताना मला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.अशा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे.