पुणे दिनांक २८ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) स्वारगेट येथील एसटी बस स्थानकात दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्य सुमारास २६ वर्षीय युवतीवर बलात्कार करून फरार झालेला आरोपी दत्तात्रेय गाडे याला मध्यरात्रीच्या सुमारास पुणे पोलिसांनी 👮 अटक करून त्याला पुण्यातील लष्कर पोलिस स्टेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.दरम्यान पोलिस आयुक्त अमितेश कुमार व सहाय्यक पोलीस आयुक्त रंजन शर्मा व पोलिस उपायुक्त आदी सर्वजण आता थोड्याच वेळापूर्वी लष्कर पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाले आहेत.आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता पुणे पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत.