Home क्राईम राष्ट्रवादीचे कृषीमंत्री कोकाटे यांचे राजकीय भवितव्य आज ठरणार! दोन वर्षांच्या स्थगितीवर होणार...

    राष्ट्रवादीचे कृषीमंत्री कोकाटे यांचे राजकीय भवितव्य आज ठरणार! दोन वर्षांच्या स्थगितीवर होणार न्यायनिवाडा; आमदार की मंत्रीपद जाणार का राहणार? याकडे राज्याचे लक्ष

    48
    0

    पुणे दिनांक १ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे  यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेच्या विरोधात त्यांनी नाशिक जिल्हा सत्रन्यायलय आज अंतिम निकाल देणार आहे.दरम्यान नाशिक येथील कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळवण्या साठी कोकाटे यांनी सत्र न्यायालयात अपील केले आहे.त्या अपिलावर सुनावणी पार पडल्यानंतर आज न्यायालय निकाल देणार आहे.दरम्यान कोकाटे यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास त्यांचे मंत्रीपद व आमदार की धोक्यात येण्याची शक्यता असून त्यांच्या राजकीय भवितव्यचा फेसला आज थोड्याच वेळात ठरणार आहे .

    दरम्यान हे प्रकरण ३० वर्षांपूर्वीचे असून मुख्यमंत्री कोट्यातून नाशिक येथे अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती.याबाबत कोकाटे यांचे कट्टर विरोधक तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती.सदरच्या प्रकरणात नाशिक येथील जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे व त्यांच्या भावाला ५० हजार रुपयांचा दंड व दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.या विरोधात कृषीमंत्री कोकाटे यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. सदर प्रकरणात यावर सत्र न्यायालयात त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आज १ मार्च यावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश नितीन जीवने हे राखून ठेवण्यात आलेल्या निर्णयावर आज निकाल देणार आहेत.दरम्यान आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास त्यांचे मंत्रीपद धोक्यात येऊन आमदारकी देखील जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Previous articleस्वारगेट बलात्कारातील आरोपीची फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविणार -पोलिस आयुक्त अमितेश कुमार
    Next article‘दत्ता गाडेला फाशी द्या ‘… स्वारगेट एसटी स्थानकावर महिलांचे तिरडी आंदोलन सुरू

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here