पुणे दिनांक २ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता पोलिसांनी 👮 आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे आता राजकीय घडामोडी देखील मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहे.यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे मंत्रीपदाच्या राजीनामा देणार असल्याचा खळबळ जनक दावा करुणा शर्मा यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवर दावा केला आहे.वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे.त्यामुळे विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर राळ उठवली होती. त्या नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला असल्याचा दावा देखील करुणा शर्मा यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा यांनी म्हटले आहे की मला याबाबत आतल्या गोटातून माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितले होते की.त्यांचा सहकारी वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी चौकशी दरम्यान दोषी निघाला तर मी स्वतः मंत्रीपदाचा राजीनामा देईन.दरम्यान दिनांक ३ मार्च सोमवार पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.दरम्यान अधिवेशन पूर्वी त्यांचा राजीनामा शंभर टक्के होणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः अधिवेशन अधीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना मंत्रीमंडळातून बाहेर काढणार आहे.अशी मला खबर मिळाली आहे.दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कुणीही असलेतरी त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे.असे मंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने सांगत होते.दरम्यान यात आता कालच सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.आरोपींचे कृत्ये बाहेर आले आहेत. आता फास्ट ट्रॅक कोर्टात लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करून त्यांना फाशीची शिक्षा होईल हे पाहिले पाहिजे.यात आता सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.यातील आरोपींना फासावरच लटकवले पाहिजे.अशी मागणी देखील करुणा मुंडे यांनी केली आहे.