पुणे दिनांक २ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट पुणे येथूनच आली आहे.संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेल्या पुण्यातील स्वारगेट येथील एसटी बस स्थानकावर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय युवतीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील आरोपी दत्ता गाडे यांने बलात्कार केला होता.तो फरार झाल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी पुणे पोलिसांनी 👮 त्याच्या मुसक्या त्याच्या गुनाट गावातून आवळल्या होत्या न्यायालयाने त्याची १२ मार्चपर्यंत पोलिस कस्टडी मध्ये रवानगी केली आहे.आज पुणे पोलिस त्याची डीएनए चाचणी पुण्यातील शासकीय रुग्णालया मध्ये करणार आहेत.दरम्यान या पूर्वीच त्याचे बल्ड सॅमपल व केस फोरेन्सिक लॅबला पाठविले आहेत. तसेच ज्या शिवशाही बसमध्ये आरोपीने बलात्कार केला होता.त्या बसची देखील पुणे पोलिसांनी 👮 फाॅरेन्सिक चाचणी देखील केलेली आहे.दरम्यान या बलात्कार केस मध्ये पुणे पोलिसांना आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले आहेत.दरम्यान आरोपी गाडे व त्यांचे वकिल व पत्नी यांनी या घटनेत सहमती ने संबंध झाले आहेत.असा दावा केला आहे.पण अत्याचार झालेली २६ वर्षीय युवती तसेच सरकारी वकील तसेच पोलिसांनी 👮 हे आरोप फेटाळून लावले आहेत.