पुणे दिनांक ३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट पुणे जिल्ह्यातील राजगड येथून आली असून.एका समाज कंटकाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ मोबाईल स्टेटस ठेवल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेल्या परिसरातील संतप्त नागरिकांनी प्रार्थना स्थळाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.त्यांनी या परिसराची पाहणी करत यातील दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान या प्रकरणी वेल्हे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक खामगंळ यांनी दिलेल्या माहिती नुसार मोबाईल स्टेटस ठेवणारी संबंधित व्यक्ती साखर मुळ गावातील आहे.मात्र मागील दोन वर्षांपासून ते पुण्यात राहण्यास आहे.यातील मुलगा हा अल्पवयीन असून तो मानसिक रुग्ण आहे.दरम्यान स्टेटसची न्यूज मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या नंतर या भागातील युवक मोठ्या संख्येने साखर गावांमध्ये दाखल झाले दरम्यान जमा झालेल्या युवकांनी प्रक्षोभक भाषण दिल्यानंतर प्रार्थना स्थळाकडे जाऊन तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या बाबत संबंधित व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असून या प्रकरणी अधिक तपास वेल्हे पोलिस करत आहेत.दरम्यान संतप्त नागरिकांची समजूत पोलिसांनी काढल्या नंतर येथील तणाव पूर्णपणे निवळला आहे. आता सध्या या गावात शांतता आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.